रत्नागिरी : आज (१ मे ) महाराष्ट्र दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची (Raj Thackeray) औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. ही सभा महाराष्ट्र सांस्कृतिक मैदानावर होणार असून या सभेसाठी राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून यावरच परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अनिल परब म्हणाले की,‘सभा घेण्याचा हा त्यांचा अधिकार आहे, पण जाती जातीमध्ये तेढ निर्माण करू नये. मनसेने किंवा कुणी हिंदुत्वाचा मुद्दा एका दिवसात उचलून चालत नाही. शेवटी सर्वांना माहिती आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वासाठी काय योगदान आहे. त्याचप्रमाणे त्यांचा पक्ष शिवसेना यांचे योगदान काय हे देखील जनता जाणते’,असेही परब म्हणाले.
दरम्यान, राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे बघायला मिळाले. तसेच राज ठाकरे यांनी राज्यातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी ३ मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला होता. ही मुदत संपण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वी आज औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांची सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत राज ठाकरे मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात आणखी काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “शरद पवारांच्या वागणूकीत मस्ती किंवा…” ; उद्धव ठाकरेंनी सांगितली आतली गोष्ट!
- IPL 2022 SRH vs CSK : दोन ‘कॅप्टन कूल’ आज भिडणार..! वाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय सांगतो!
- “असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप पाहिलेत”; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर टोला
- IPL 2022 DC vs LSG : लखनऊची टॉस जिंकून पहिली बॅटिंग; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!
- “पैसे देऊन नागरिकांना…”, राज ठाकरेंच्या सभेवर चंद्रकांत खैरे यांची टीका


