🕒 1 min read
पुणे : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ४६वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs CSK) यांच्यात होणार आहे. हा सामना पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी साडेसातपासून खेळवला जाईल. आयपीएलच्या १५व्या मोसमात सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत ८ सामन्यांत ५ विजय नोंदवले असून ते चौथ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, चेन्नई सुपर किंग्जने ८ पैकी फक्त २ सामने जिंकले असून गुणतालिकेत ते नवव्या स्थानावर आहेत. चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद पुन्हा एकदा महेंद्रसिंह धोनीकडे आले आहे. अशा परिस्थितीत सीएसकेचे चाहते या सामन्याबद्दल नक्कीच उत्सुक असतील.
चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात वरचष्मा नेहमीच चेन्नईचा राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्जने १२ सामने जिंकले असून सनरायझर्स हैदराबादने केवळ ५ सामने जिंकले आहेत. दोन्ही संघांमधील मागील सहा सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्जने चार सामने जिंकले आहेत. मात्र, या मोसमात उभय संघांमधील अखेरच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने शानदार विजय मिळवला.
Ready for the new rising challenge! ????v???? Catch the vibes of the Superkings and get. Set. Whistle! ????#SRHvCSK #Yellove #WhistlePodu ???????? @amazonIN #AmazonPay pic.twitter.com/nvh62FEoYX
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) May 1, 2022
हैदराबाद विरुद्ध चेन्नईच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीने ३५३धावा केल्या आहेत. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सध्याच्या खेळाडूंमध्ये कर्णधार केन विल्यमसनच्या नावावर सर्वाधिक ३७० धावा आहेत. ड्वेन ब्राव्होने चेन्नईकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १८ विकेट घेतल्या आहेत. तर हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारच्या नावावर सर्वाधिक ९ विकेट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
