Share

“जखम रातोरात बरी करण्याचे औषध जनहितार्थ जाहीर करावे”; रोहित पवारांचा सोमय्यांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी किरीट सोमय्यांवर शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याने गाडीची काच फुटली होती. तसेच किरीट सोमय्यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली होती. या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेऊन यांच्या गाडीवर फेकण्यात आलेला दगड देखील त्यांनी पोलिसांना आणि माध्यमांना दाखवला होता.

https://www.facebook.com/100044164193097/posts/549618519853616/?app=fbl

किरीट सोमय्या यांना झालेली जखम ही रातोरात ठीक झाली. या पाश्वर्भूमीवर रोहित पवार यांनी किरीट सोमय्यांना जोरदार टोला लगावला. रोहित पवार म्हणाले, “छोटे व्यापारी, शेतकरी, कामगार काम करताना अनेकदा जखमी होतात. त्यामुळे चार-आठ दिवस मलमपट्टी किंवा कापडाने जखम दुखत असली तरी त्यांना त्याच पद्धतीने काम करावे लागते. पण अशी जखम रातोरात बरी करण्याचे औषध भाजप नेत्यांकडे आहे आणि त्यांनी ते जनहितार्थ जाहीर करावे”.

किरीट सोमय्यांचा वैद्यकीय अहवाल जाहीर –

या हल्ल्याबाबत आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. किरीट सोमय्या यांना झालेली दुखापत गंभीर नसल्याचं भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे. काच फुटल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीला जखम झाली होती. ही जखम ०.१ सेमीची होती, तसंच रक्तस्त्राव झाला नव्हता, असे वैद्यकीय तपासणीच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते. हा अहवाल रुग्णालयाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आला आहे असे बोलले जात आहे. वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!