Share

“महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे कर कमी करा”;  मोदींनी ठाकरेंना सुनावलं

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील कर कपातीवरुन गैर भाजप शासीत राज्यांना सुनावले आहे.

मोदींनी पेट्रोलचे भाजपशासीत राज्यातील दर आणि गैर भाजपशासीत राज्यांचे दर वाचून दाखवले. गुजरात आणि कर्नाटकनं कर कमी करुन हजारो कोटींचं नुकसान सहन केलं आणि त्यांच्या शेजारच्या राज्यानं या काळात कर रुपी हजारो कोटी कमावल्याचा उल्लेख मोदींनी महाराष्ट्राचं नाव न घेता केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.

तसेच राज्यांना तेलाच्या किमती कमी करण्याचे आवाहन केले. कोरोनावर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या संभाषणात पंतप्रधान मोदींनी राज्यांना ‘सहकारी संघराज्यवाद’ च्या भावनेनुसार मूल्यवर्धित कर कमी करण्याचे आवाहन केले आहे. देशातील सतत वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींबाबत पीएम मोदींनी अशा राज्यांचाही अहवाल दिला, ज्यांनी तेलाच्या किमतींवरील कर कमी केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या दर वाढी दरम्यान कर कमी न करणाऱ्या राज्यांबाबत मी कोणावरही टीका करत नाही, फक्त चर्चा करत आहे, असेही ते म्हणाले.

काही राज्यांनी इंधनावरील कर कमी करण्याबाबत ऐकले नाही. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बंगाल, तामिळनाडू, झारखंड, केरळ या राज्यांनी काही कारणांमुळे त्याकडे दुर्लक्ष केले. केंद्राने उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर काही राज्यांनी पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली नाही, हा जनतेवर अन्याय असल्याचे पंतप्रधान म्हणाले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींना पंतप्रधान मोदींनी युक्रेन-रशिया युद्धाचे कारण दिले आहे. सीएनजी, पीएनजी, पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढत असलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना पंतप्रधान मोदींनी असे भाष्य केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!