मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धेचा ४०वा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद (GT vs SRH) या दोन दिग्गज संघांमध्ये खेळवला जाईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ गुणतालिकेत तिसऱ्या तर गुजरात टायटन्स संघ दुसऱ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळेल.
आयपीएलच्या १५व्या मोसमात, गुजरात टायटन्सने आतापर्यंत ७ सामन्यात ६ विजय नोंदवले आहेत आणि त्यांचा एकमेव पराभव सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झाला आहे, तर सनरायझर्स हैदराबादने पहिले दोन सामने गमावल्यानंतर सलग ५ सामने जिंकले आहेत.
गुजरात टायटन्ससाठी आतापर्यंत अनेक खेळाडूंची कामगिरी चांगली झाली आहे. हार्दिक पंड्या, राहुल तेवतिया आणि डेव्हिड मिलर या खेळाडूंनी संघासाठी सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, जर आपण सनरायझर्स हैदराबादबद्दल बोललो तर त्यांची मधल्या फळीतील फलंदाज चमकदार खेळत आहेत आणि संघाचे गोलंदाजही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत.
https://twitter.com/gujarat_titans/status/1519256782039707649
आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत फक्त एकच सामना झाला असून त्यात सनरायझर्स हैदराबादने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात नाबाद ५० धावांची खेळी केली. संघाला त्याच्याकडून पुन्हा एकदा अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. हैदराबादसाठी, त्यांचा कर्णधार केन विल्यमसनने गुजरात टायटन्सविरुद्ध अर्धशतक झळकावले. मात्र, त्यानंतर त्याला मोठी खेळी खेळता आलेली नाही. राशिद खान आणि हार्दिक पंड्या यांनी गुजरातसाठी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चांगली गोलंदाजी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

