🕒 1 min read
मुंबई : मंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे. “मला नाटक जमत नाही, मला काम जमतं. नाटक करणारे जेलमध्ये गेले आहेत. मी कडू असले तरी खरं बोलते, जे आहे ते तोंडावर बोलते. नौटंकी करत नाही, जेलमध्ये जावं लागत नाही. नाहीतर काही लोक तमाशाच करतात”. तसेच मी स्पष्ट आणि सरळ आहे असे देखील यशोमती ठाकूर म्हणाल्या.
राणा दाम्पत्य अटक प्रकरण –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा रवी राणा आणि नवनीत राणा यांनी केली होती. या घोषणेसह राणा दाम्पत्यांनी वाद निर्माण होईल अशी दोन वक्तव्ये केली होती. यावरून राजद्रोहाच्या कलमासह अन्य कलमांखाली खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावेळी राणा यांनी वारंटची मागणी करत, हाय वोल्टेज ड्रामा केला. दरम्यान पोलीस आणि राणा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली.
या प्रकरणावरून राणा दाम्पत्य यांच्यावरील सुनावणी पूर्ण होऊन त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या पाश्वर्भूमीवर मंत्री यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्याला टोला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
