Share

ईडी राणाला चहा कधी देणार?; “…कमाईचा काही भाग अजूनही नवनीत राणांच्या खात्यात”, संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Published On: 

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी ट्वीट करत आज (२७ एप्रिल) मोठा दावा केला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सध्या हनुमान चालीसा प्रकरणी राणा दाम्पत्य कारागृहात असून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मात्र राऊतांच्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसून येत आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट मध्ये काय म्हटले?

‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’ , लकडावाला यांना 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांचा लॉकअपमध्येच मृत्यू झाला. युसूफच्या अवैध कमाईचा काही भाग अजूनही नवनीत राणा यांच्या खात्यात आहे. मग ईडी राणाला चहा कधी देणार? या डी-गँगला का वाचवले जात आहे? भाजप गप्प का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

तसेच तुरुंगात मरण पावलेल्या युसूफ लकडावाला यांच्याकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. आणि डी गँगशीही त्याचे संबंध होते. ईडीने याची चौकशी केली का? असा सवाल करत संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “काल एक पुरावा मी समोर आणला आहे. राणा दाम्पत्य  अचानक रामभक्त, हनुमानभक्त झालेत. त्या भक्तीत इतके बुडाले की मुंबईत येऊन धिंगाणा घालू लागले. मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न करु लागले. राज्यात सध्या जे भोंगे प्रकरण सुरु आहे तसंच हनुमान चालिसाच्या निमित्ताने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन असून १९९२ सालच्या दंगलीमध्ये अंडरवर्ल्ड, पाकिस्तान, डी गँग कनेक्शन होते. १५ दिवसापासून जे काही घडतंय त्यातून पुन्हा एकदा त्याच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.

पुढे ते म्हणाले की, लकडावालाने मनी लाँड्रिंग केले असून तो पैसा अनेक ठिकाणी फिरवला. याचाच एक लाभार्थी राणा दाम्पत्य  आहे. हे पैसे का आणि कशासाठी घेतले हा तपासाचा भाग आहे. मात्र एका गुन्हेगाराकडून घेतलेल्या पैशांचा वापर कुठे केला?  याचा तपास मुंबईच्या आर्थिक शाखेने का केला नाही? याचा तपास करणे गरजेचे आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!