🕒 1 min read
मुंबई: हनुमान चालीसा प्रकरणी सध्या कारागृहात असलेल्या राणा दाम्पत्याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठा खुलासा केला आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत (sanjay raut) यांनी ट्वीट करत केला आहे.
संजय राऊत यांनी नेमके कोणते आरोप केले?
‘अंडरवर्ल्ड कनेक्शन’ , लकडावाला यांना 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यांचा लॉकअपमध्येच मृत्यू झाला. युसूफच्या अवैध कमाईचा काही भाग अजूनही नवनीत राणा यांच्या खात्यात आहे. मग ईडी राणाला चहा कधी देणार? या डी-गँगला का वाचवले जात आहे? भाजप गप्प का? तसेच तुरुंगात मरण पावलेल्या युसूफ लकडावालाकडून नवनीत राणा यांनी 80 लाखांचे कर्ज घेतले होते. त्याला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. आणि डी गँगशीही त्याचे संबंध होते. ईडीने याची चौकशी केली का? असा सवाल करत संजय राऊत यांनी हा राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याचे म्हटले आहे.
नवनीत राणा ने युसुफ लकड़ावाला से ₹80 लाख का लोन लिया था,जिनकी जेल में मौत हो गई थी।उसी लकड़ावाला को @dir_ed ने मनी लॉन्ड्रिंग मामले में गिरफ्तार किया था व उसके डी गैंग से संबंध भी थे।
मेरा सवाल-क्या ED ने इसकी जांच की ? राष्ट्रीय सुरक्षा का मामला है! @KiritSomaiya @sanjayp_1 pic.twitter.com/u0h8cmT0He— Sanjay Raut (@rautsanjay61) April 26, 2022
दरम्यान आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, “लकडावालाने मनी लाँड्रिंग केले असून तो पैसा अनेक ठिकाणी फिरवला. याचाच एक लाभार्थी राणा दाम्पत्य आहे. हे पैसे का आणि कशासाठी घेतले हा तपासाचा भाग असून एका गुन्हेगाराकडून घेतलेल्या पैशांचा वापर कुठे केला? याचा तपास मुंबईच्या आर्थिक शाखेने का केला नाही? याचा तपास करणे गरजेचे आहे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
काल एक पुरावा मी समोर आणला आहे. राणा दाम्पत्य अचानक रामभक्त, हनुमानभक्त झालेत. त्या भक्तीत इतके बुडाले की मुंबईत येऊन धिंगाणा घालू लागले. मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न करु लागले. राज्यात सध्या जे भोंगे प्रकरण सुरु आहे तसंच हनुमान चालिसाच्या निमित्ताने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे यामागे अंडरवर्ल्ड कनेक्शन आहे. कारण १९९२ सालच्या दंगलीमध्ये अंडरवर्ल्ड, पाकिस्तान, डी गँग कनेक्शन होते. १५ दिवसापासून जे काही घडतंय त्यातून पुन्हा एकदा त्याच प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच लकडावाला अगोदर EOW कस्टडीत होता मग तो ईडीच्या ताब्यात गेला. मात्र याची चौकशी का झाली नाही? मविआ नेत्यांची चौकशी करता मग याची का नाही? राणांना का वाचवंल जात आहे? तसेच या प्रकरणावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का?, इतरवेळी पोपटासारखे बोलणारे आता गप्प बसलेत. विरोधी पक्षात इतके सोंगाडे भरलेत की, प्रत्येकावर एक स्वतंत्र सिनेमा निघेल. असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ईडी राणाला चहा कधी देणार?; “…कमाईचा काही भाग अजूनही नवनीत राणांच्या खात्यात”, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
- नवनीत राणा कधीपासून मागासवर्गीय झाल्या?; संजय राऊतांचा फडणवीसांना सवाल
- “भाजपच्या गौळणीने दुसऱ्यांना नाच्या म्हणणं शोभत नाय”; VIDEO ट्विट करत मिटकरींचा सदाभाऊंना टोला
- “…नरेंद्र मोदी असते तरी शिवसैनिकांनी गाडी फोडली असती”, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांचे मोठे वक्तव्य
- भाजपच्या धमन्यांत हिंदुत्वाचे रक्त नसून टोमॅटो सॉस आहे- संजय राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
