🕒 1 min read
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या रवी राणा आणि नवनीत राणा यांची भेट घेण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी किरीट सोमय्यांवर शिवसैनिक जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक झाले होते. यावेळी शिवसैनिकांनी गाडीवर दगडफेक केल्याने गाडीची काच फुटली होती. तसेच किरीट सोमय्यांच्या चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली होती. या हल्ल्याप्रकरणी किरीट सोमय्यांनी वांद्रे पोलिसात धाव घेऊन यांच्या गाडीवर फेकण्यात आलेला दगड देखील त्यांनी पोलिसांना आणि माध्यमांना दाखवला होता.
पुढे शिवसैनिकांनी पोलिसांच्या मदतीने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला, असा दावा करत सोमय्या यांनी थेट दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिवांकडे या घटनेची चौकशी करण्याची मागणी केलेली. मात्र या हल्ल्याबाबत आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. किरीट सोमय्या यांना झालेली दुखापत गंभीर नसल्याचं भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाले आहे.
काच फुटल्यानंतर सोमय्या यांच्या हनुवटीला जखम झाली होती. ही जखम ०.१ सेमीची होती, तसंच रक्तस्त्राव झाला नव्हता, असे वैद्यकीय तपासणीच्या अहवालात नमूद करण्यात आल्याचे समजते. हा अहवाल रुग्णालयाकडून मुंबई पोलिसांना देण्यात आला आहे असे बोलले जात आहे. वैद्यकीय अहवाल समोर आल्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.
एकीकडे, भाभा रुग्णालयातील वैद्यकीय अहवालातून सोमय्या यांना झालेली जखम गंभीर असे सिद्ध होत असताना दुसरीकडे आज किरीट सोमय्या यांच्यासह भाजपचे काही नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत भाजप नेत्यांकडून राज्यपालांकडे काय मागणी केली जाईल? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
