🕒 1 min read
मुंबई : तब्बल १८ दिवसांनंतर कोठडीतून बाहेर आलेले एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एक मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावणे हाच एक अंतिम पर्याय असल्याचे, सदावर्ते यांनी रोखठोकपणे म्हंटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर एसटी कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची झालेली जेलवारी ही तब्बल १८ दिवसांनंतर संपली.
सदावर्ते यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक अपेक्षा ही व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात सध्या आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती नसावी, अशी अपेक्षा मला उद्धव ठाकरे यांच्याकडून आहे, असे ते म्हंटले. तसेच, नेल्सन मंडेलांना सुद्धा अपराधी दाखवलं होतं. राईट टू लिबर्टीचा विषय होता. इंदिराजींना ही या देशातील पत्रकारांना सेन्सॉरशिप केली होती. आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे पाईक आहोत. त्यामुळे सरकारने आपल्या वागण्याचा थोडा विचार करावा, असेही सदावर्ते म्हणाले.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. सुरुवातीला शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची मालिका सुरु झाली होती. त्यानंतर पुणे, सातारा, बीड, कोल्हापूर, सोलापूर, अकोला इथपर्यंत ही मालिका येऊन पोहचली. सदावर्ते यांना पुणे पोलीस ताब्यात घेणार होते. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्याने तब्बल १८ दिवसांनंतर ते जेलमधून बाहेर पडले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
