Share

“मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावरच मुंबईत हल्ले”; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. पण या बैठकीला जाणं भाजपच्या नेत्यांनी टाळलं आहे. याबाबत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडत राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली खरी पण या गृहमंत्र्यांना काही अधिकार आहेत का? मुंबईत जे काही चाललंय ते सगळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्यावर चाललं आहे. या बैठकीला मुख्यमंत्रीच उपस्थित राहिले नाहीत. मग ही बैठक टाइमपाससाठी होती का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईतील हल्ले मुख्यमंत्री कार्यालयाच्या आदेशाने होत आहेत तर राज्यभरातील हल्ले गृहमंत्र्यांच्या आदेशाने होत आहेत. हनुमान चालीसा म्हणंण राजद्रोह असेल तर आम्ही रोज म्हणू. हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का? भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय. राज्यात सरकार हिटलरप्रमाणे वागतंय. मोहित कंबोज यांच्यावर मॉबलीन्चिंगसारखा हल्ला केला. झुंडशाहीला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ.”

भाजपाने बहिष्कार का टाकला?

राज्य सरकारकडून आज आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपने बहिष्कार का टाकला, यांचं कारण देखील सांगितलं. फडणवीस म्हणाले, “आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं. परंतु ज्या काही घटना मागील चार-पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारने संवादासाठी जागा ठेवलीय असं आम्हाला वाटत नाही. जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल, तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. अशाप्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे.”

महत्वाच्या बातम्या –

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!