भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. भाजपने यावर आक्रमक भूमिका घेत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यासाठी भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहचले आहे.
याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि महाराष्ट्राला अशांत करण्याचा उद्देश दिसतो आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.