Share

IPL 2022 PBKS vs CSK : आज कोण ठरणार खरा किंग? हेड-टू-हेड आकडेवारीत ‘या’ संघाचं पारडं आहे जड!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)चा ३८वा सामना पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज (PBKS vs CSK) यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवला जाईल. या आयपीएल हंगामात दोन्ही संघांनी अनेक सामने गमावले आहेत आणि अशा परिस्थितीत हा सामना जिंकणे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहे.

आयपीएल २०२२मध्ये, ३ एप्रिल रोजी दोन्ही संघांमधील सामना खेळला गेला, ज्यामध्ये पंजाब किंग्जने ५४ धावांनी एकतर्फी विजय मिळवला. आयपीएलच्या १५व्या हंगामात, पंजाब किंग्ज ७ सामन्यांतून ३ विजयांसह गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहे, तर चेन्नई ७ सामन्यांतून केवळ २ विजय मिळवू शकला आहे आणि नवव्या स्थानावर आहे. यामुळे दोन्ही संघांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे.

हेड टू हेड आकडेवारीत चेन्नई सुपर किंग्जचा वरचा हात आहे. चेन्नई सुपर किंग्जने १५ सामने जिंकले असून पंजाब किंग्जने ११ सामने जिंकले आहेत. मागील हंगामात दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध विजय मिळवला होता. आधी चेन्नईने पंजाबचा पराभव केला आणि नंतर पंजाबने विजय मिळवला. मात्र, या मोसमात एकदा पंजाबच्या संघाने चेन्नईचा पराभव केला आहे.

शिवम दुबेने चेन्नई सुपर किंग्जकडून पंजाब किंग्जविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सर्वाधिक ५७ धावा केल्या. पंजाबसाठी चेन्नईविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोनने सर्वाधिक ६० धावा केल्या. ड्वेन ब्राव्होने पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात १६ विकेट घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!