Share

असं कुठे असतं का किरीटजी? “स्वतःच नखाने मारून रक्त काढता मग..”, रुपाली पाटलांचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या गाडीवर  शनिवारी खार पोलीस स्थानकासमोर हल्ला झाला होता. मात्र सोमय्या यांच्या हनुवाटीला झालेली जखम कृत्रिम असण्याची शंका व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तपास केला जाणार असून सत्यता पडताळण्यासाठी परिसरातील सीसीटीव्हीही तपासले जाणार आहे. मात्र यावरच राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil ) ठोंबरे यांनी खोचक सवाल करत सोमय्यांना टोला लगावला आहे.

“असं कुठे असते का किरीटजी? तुमचा संबंध नसताना तुम्ही जाणीवपूर्वक चेतावणी द्यायला जाता, स्वतःच नखाने मारून रक्त काढता आणि नंतर मारले मारले बोंब मारता. कायद्या, सुविधा ,समाज यांना वेठीस धरता. हे कोणाच्या सांगण्यावरून करत आहात? तुम्ही आहात तरी कोण? माजी खासदार,  बेछूट ,बेसलेस आरोप करण्याशिवाय आपली ओळख काय? याचा विचार करावा.”, असा टोला रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत लगावला आहे.

https://www.facebook.com/Rupalispeak/posts/7575605779146387

तसेच “महाराष्ट्रात अनेक महत्वाचे प्रश्न आहे ते सामोरे जाऊन सोडवण्याचा प्रयत्न यशस्वी करू या. त्यात हातभार लावा किरीटजी, बघा चांगलं वागणं, चांगला माजी लोकप्रतिनिधी बनता येत का? तुम्ही प्रयत्न केला तर नक्की जमेल. तुम्ही परप्रांतीय असले तरी महाराष्ट्राच्या मिठाला जागताल!”, असेही रुपाली पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान सोमय्यांवरील हल्ल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडले असल्याचे म्हटले आहे. तसेच भाजप नेत्यांनी राष्ट्रपती राजवटीचीही मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!