पुणे : हैद्राबाद येथे झालेल्या दहाव्या सबज्युनिअर राष्ट्रीय ताँग-इल-मुडो स्पर्धेत भोसरीतील हायब्रॉन स्पोर्ट्स क्लबच्या अर्णव रवींद्र लाहुडकर याने 27 ते 31 या वजन गटात सुवर्ण पदक पटकावले. उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी डिसेंबर 2019 मध्ये हैद्राबाद येथेच झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्याने कांस्य पदक मिळविले होते. अर्णव हा भोसरीतील सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये इयत्ता सातवीत शिकत आहे.
दिनांक 15 ते 18 एप्रिल दरम्यान हैद्राबादच्या वनस्थलीपुरम या ठिकाणी झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने प्रथम सांघिक पारितोषिक प्राप्त करत ६ सुवर्ण, ५ रौप्य आणि १ कांस्यपदकांची कमाई केली. या स्पर्धेत १० राज्यांतील एकूण २७५ खेळाडूंनी सहभाग घेतला.
वनस्थलीपुरमचे आमदार देवीरेड्डी सुधीररेड्डी, ताँग-इल-मुडो असोसिएशनचे सचिव मोहम्मद अर्शद यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिक देण्यात आले. विजेत्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक साबीर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. संघव्यवस्थापक म्हणून नेहा दिवटे आणि अजिंक्य पाटोळे यांनी काम पाहिले. सामाजिक कार्यकर्ते रमेश दिवटे, फिरोजा शेख यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
पदक विजेत्या खेळाडूंची नावे : अर्णव लाहुडकर (सुवर्ण), दूर्वा मुळूक (रौप्य), सायना पाटील (सुवर्ण), रुद्रांशी परिदा (रौप्य), दिव्या जगताप (सुवर्ण), पार्थ मर्ढेकर (सुवर्ण), रुद्र भुसारे (रौप्य), आरुष चासकर (रौप्य), प्रज्वल अष्टेकर (सुवर्ण), दर्शन ओझा (सुवर्ण), सिद्धेश सोलंकी (रौप्य), अनुप शिंदे (कांस्य).
महत्वाच्या बातम्या :


