🕒 1 min read
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. फडणविसांनी हनुमान चालीसावर आक्रमक वक्तव्य केली आहेत. हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का? असा प्रश्नही पत्रकार परिषदेत यावेळी त्यांनी उपस्थितीत केला.
हनुमान चालीसा म्हणंण राजद्रोह असेल तर आम्ही रोज म्हणू. हनुमान चालीसा भारतात नाही तर पाकिस्तानात म्हणायची का? भाजपच्या नेत्यांना टार्गेट केलं जातंय. राज्यात सरकार हिटलरप्रमाणे वागतंय. मोहित कंबोज यांच्यावर मॉबलीन्चिंगसारखा हल्ला केला. झुंडशाहीला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ. मुंबईतील हल्ले मुख्यमंत्री कार्यालयाच्या तर राज्यभरातील हल्ले गृहमंत्र्यांच्या आदेशाने होत आहेत, असा थेट आरोप फडणविसांनी केला आहे.
राज्य सरकारकडून आज आयोजित करण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीवर भाजपने बहिष्कार का टाकला, यांचं कारण देखील फडणवीसांनी सांगितले म्हणाले, “आज राज्याच्या गृहमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं. परंतु ज्या काही घटना मागील चार-पाच दिवस आम्ही मुंबई आणि महाराष्ट्रात पाहतोय, त्या घटना बघितल्यानंतर या सरकारने संवादासाठी जागा ठेवलीय असं आम्हाला वाटत नाही. जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल, तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. अशाप्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातला आहे.”
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
