🕒 1 min read
मुंबई: नागालँडमधून एकमेव राज्यसभेच्या जागेवर भाजपच्या एस.फान्सगॉन कोन्याक (S. Fansgun Konyak) यांची बिनविरोध निवड झाली आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात स्थान मिळविणाऱ्या त्या राज्यातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. याचाच संदर्भ देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भाजप केवळ समानतेच्या गप्पा मारत नाही असे म्हणत त्यांनी एस.फान्सगॉन कोन्याक यांचे कौतुक केले आहे.
मेरा देश बदल रहा है! नागालँडमधील पहिल्या महिला राज्यसभा खासदार म्हणून निवड झाल्याबद्दल भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षा एस.फान्सगॉन कोन्याक यांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. त्यांची राज्यसभेत झालेली निवड ही भाजपा केवळ समानतेच्या गप्पा मारत नाही तर खर्या अर्थाने त्याची अंमलबजावणीही करते,याचे मोठे उदाहरण आहे. असे ट्वीट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
दरम्यान भाजपने आसाम, त्रिपुरा आणि नागालँड या तीन ईशान्येकडील राज्यांमधून चार राज्यसभेच्या जागा जिंकल्या असून युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल (UPPL) ने आसाममधून राज्यसभेची एक जागा जिंकली आहे. तर काँग्रेसने केरळमधून एक जागा जिंकली आहे. अशा सहा नवनिर्वाचित राज्यसभेच्या खासदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.
महत्वाच्या बातम्या:
IPL 2022: ‘पॉवर हिटिंगची क्षमता असूनही…’ बॅक टू बॅक दुसऱ्या पराभवानंतर कॅप्टन केन संतापला!
“आधी लगीन रिफायनरीचे नंतर संपर्काचे”, भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला
“…याबद्दल आव्हाडांना कधी पुळका आला नाही”, अविनाश जाधवांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
