Share

IPL 2022 दरम्यान चेतेश्वर पुजाराला बसला ‘मोठा’ धक्का; रशिया-युक्रेन युद्धामुळं त्याच्यासोबत झाला ‘असा’ प्रकार!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला मोठा धक्का बसला आहे. काऊंटी चॅम्पियनशिपमधील ससेक्सच्या पहिल्या सामन्यातून पुजारा बाहेर पडला आहे. खरे तर, श्रीलंकेविरुद्धच्या भारतीय कसोटी संघातून वगळल्यानंतर पुजाराने काऊंटी चॅम्पियनशिपसाठी इंग्लंडच्या ससेक्स संघाशी करार केला होता. तो ७ एप्रिल रोजी ससेक्ससाठी पदार्पण करणार होता, परंतु त्याआधीच त्याला धक्का बसला. तो ससेक्सच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडला आहे.

पुजाराच्या व्हिसावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही, त्यामुळे तो पहिल्या सामन्यात संघाचा भाग होऊ शकणार नाही. पुजाराच्या व्हिसा प्रकरणाला झालेला विलंब रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे झाल्याचे मानले जात आहे.

https://twitter.com/ESPNcricinfo/status/1511067329563668486

ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रॅव्हिस हेडच्या जागी पुजाराला ससेक्सने सामील केले आहे. राष्ट्रीय संघातील कामाचा ताण पाहता हेड ससेक्स संघापासून वेगळा झाला. पुजाराने कसोटी क्रिकेटमध्ये ६५००हून अधिक धावा केल्या आहेत. ससेक्स हा त्याचा चौथा काऊंटी संघ आहे. यापूर्वी तो डर्बीशायर, नॉटिंगहॅमशायर आणि यॉर्कशायरकडूनही खेळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!