Share

“त्यांना भोंगा, मशीद, मुस्लमान अशा गोष्टी ऐकायला आल्या की…”; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई : २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. यावेळी बोलत असतांना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला. तसेच यावेळी त्यांनी राज्यातील मदरशांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली. या मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरेंवर टीका केली. तसेच राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईन, असे आव्हान केले. दरम्यान, आव्हाडांच्या टीकेवर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना अविनाश जाधव म्हणाले की,‘जितेंद्र आव्हाड यांना एक गोष्ट नक्की माहिती आहे की राज ठाकरेंच्या बाबतीत बोललो की त्यांना प्रसिद्धी मिळते. मुंब्र्यामधील लोक वाह वाह करतात आणि म्हणूनच ते पुढे येतात. तीन तीन वेळा बोलायची काय गरज आहे.’ तसेच जितेंद्र आव्हाडांना भोंगा, मशीद, मुस्लमान अशा गोष्टी ऐकायला आल्या की त्यांच्या अंगात देव संचारतो. ते भडभड बोलायला सुरुवात करतात, असेही जाधव यावेळी म्हणाले.

दरम्यान, ‘राज ठाकरे यांनी मुंब्र्याबद्दल कारण नसताना जातीयवादी विधान केले. माझं राज यांना जाहीर आव्हान आहे की, त्यांनी माझ्यासोबत मुंब्र्यातील कोणत्याही मदरशात यावे. दाढीचा वस्तरा जरी सापडला तरी राजकारण सोडून देईल. मुंब्र्यात काही शतक हिंदू मुसलमान प्रेमानी राहतात मुंब्र्याला बदनाम करू नका. कळवा-मुंब्रा ह्या मतदार संघात ६७% हिंदू आहेत आणि ३३% मुसलमान त्यात मी ७५००० मतांनी विजयी झालो कळव्यातून ३०००० ची आघाडी आणि मुंब्र्यातून ४५००० मतांची आघाडी.’ तसेच लोकं कामावर मतं देतात जाती पाती वर नाही. त्यासाठी १८ तास राबावे लागते. शेवटच्या माणसा पर्यंत पोहचावे लागते,’ असे जितेंद्र आव्हाड म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!