मुंबई: आयपीएलच्या १५ व्या हंगामातील १२ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात डॉ. डीवाय पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक झाली तेव्हा नाणे सनरायझर्स हैदराबादच्या बाजूने पडले. प्रथम फलंदाजीला आलेल्या सुपर जायंट्सची सुरुवात खूपच खराब झाली. हैदराबादच्या वॉशिंग्टन सुंदरने लखनऊच्या अवघ्या २ षटकांत दोन गडी बाद केले. मात्र त्याची गोलंदाजी संघाची लाज वाचवू शकली नाही आणि संघाला १२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
लखनऊ सुपर जायंट्स (SRH vs LSG) या नवख्या संघाकडून पराभव झाल्यानंतर केन विल्यमसनने (kane williamson) खेळाडूंना सुधारणा करायची गरज असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, “जर तुम्ही कामगिरीवर नजर टाकली तर आमच्या पहिल्या सामन्यापासून नक्कीच बरीच सुधारणा झाली होती. चेंडूने चांगली सुरुवात केली. आम्ही मजबूत स्थितीत होतो. जर आम्ही पुढील भागीदारी मोडू शकलो असतो तर खेळ पालटला असता. हुडा (deepak hooda) आणि राहुल (KL Rahul) यांना त्यांच्या विजयाचे श्रेय जाते. हा एक क्लोज सामना होता परंतु पुरेसा जवळ नव्हता.”
हैदराबादने सामना कुठे गमावला हे सांगताना केन म्हणाला “१७० हे कोणत्याही दिवशी आव्हानात्मक लक्ष्य असते.. चांगला खेळ केला पाहिजे. पण त्याच वेळी आम्हाला माहित होते की आम्ही भागीदारी तयार करू शकतो, चांगली सुरुवात करू शकतो, आमच्याकडे पॉवर हिटिंगची पुरेशी क्षमता आहे. आज मात्र ते फारसे काम केले नाही.बॉलिंग उत्कृष्ट होती. एक दोन इथल्या तिथल्या धावांनी खेळ बदलतो.”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 दरम्यान चेतेश्वर पुजाराला बसला ‘मोठा’ धक्का; रशिया-युक्रेन युद्धामुळं त्याच्यासोबत झाला ‘असा’ प्रकार!
- “…याबद्दल आव्हाडांना कधी पुळका आला नाही”, अविनाश जाधवांचा हल्लाबोल
- “त्यांना भोंगा, मशीद, मुस्लमान अशा गोष्टी ऐकायला आल्या की…”; जितेंद्र आव्हाडांच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर
- “महाराष्ट्र पेटवू नका”, जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंना विनंती
- “पवार साहेब काय आहेत हे एकदा मोदीजींना विचारा”, अमोल मिटकरींचा चंद्रकांत पाटलांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

