Share

शेतीला मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; सरकारचे मोठे धोरण!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकार नेहमी विविध योजना घेऊन येत असताना पाहायला मिळते. त्याच अनुशंगाने सरकार आधुनिक तंत्रज्ञानाबद्द्ल शेतकऱ्यांना माहिती आणि त्याचा शेतकऱ्यांना वापर करता यावा यासाठी जनजागृती करत आहे.

शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी देशभरात शेतीला हायटेक शेती करण्यासाठी केंद्र सरकारचा प्रयत्न सुरू आहेत. याच उद्देशाने सरकारने यंदाच्या केंद्रीय कृषी अर्थसंकल्पात शेतीला हायटेक करण्याचा निर्णय घेतला आहे. शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर ही पध्दत सोपी होणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार आहे असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

नव्या तंत्रज्ञानाचा वापर –

पारंपरिक शेतीला बाजूला सारत नव्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादन वाढीसाठी केंद्र सरकारने तरतूद केली आहे. देशाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेऊन मांडण्यात आला आहे. शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी गंगा नदीच्या काठावर पाच किलोमीटर रुंदीचा कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव ठेवण्याात आला आहे.

ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन मिळणार –

शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्यासाठी पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून योजना सुरू करण्यात येणार आहे. ड्रोनचा वापर आता कृषी कामांसाठी करण्यात येणार आहे. यामुळे कीटकनाशकांची फवारणी, रोगराईची पाहणी, भूमी अभिलेख व कीटकनाशकांचे डिजिटायझेशन यासाठी वापर केला जाणार आहे. तसेच तेलबियांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी सर्वसमावेशक योजना राबविण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!