नवी दिल्ली: संसद भवनात शिवसेने नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार या दोन्ही नेत्यांनी 20 मिनिटे चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली असे बोलले जात आहे. या भेटीत नेमकी कशावर चर्चा झाली? हे गुपित असल्यासारखे आहे.
परंतु, सूत्रांच्या माहितीनुसार पाच राज्यातील निवडणूक निकाल, भाजपचं वाढतं प्राबल्य, महाराष्ट्रातील राजकारण आणि विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबतही या नेत्यांमध्ये चर्चा झाली असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या महाराष्ट्रातील सर खासदारांशी संवाद साधला. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीत नक्की काय चर्चा झाली याबाबत दोन्ही नेत्यांकडून काहीही उघड करण्यात आलेले नाही. मात्र, पाच राज्यांच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.
दोन्ही नेत्यांची 20 मिनिटे एकमेकांशी चर्चा –
सध्या संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे शरद पवारांची भेट घेणार असल्याचं सांगितलं जात होतं. ही भेट पवारांच्या निवासस्थानी होईल, असंही सांगितलं जात होतं. मात्र, ही भेट संसदभवनात झाली. संसद भवनातच या दोन्ही नेत्यांनी 20 मिनिटे एकमेकांशी चर्चा केली.
महत्वाच्या बातम्या –


