🕒 1 min read
मुंबई: महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बुधवारी माऊंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाचा ४ गडी राखून पराभव केला. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ फलंदाजीत फारसे काही करू शकला नाही आणि ३४ षटकात १३४ धावा करून सर्वबाद झाला. यानंतर इंग्लिश संघाने ३१ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले. मात्र या सामन्यात झुलन गोस्वामीने इतिहास रचला आहे.
या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५० विकेट्स पूर्ण करणारी गोस्वामी (jhulan goswami) ही पहिली महिला गोलंदाज ठरली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम झुलनच्या नावावर आहे. तिने इंग्लंडची फलंदाज टॅमी ब्युमॉन्टची विकेट घेत हा इतिहास घडवला. भारताकडून मेघना सिंगने डॅनियल व्याटला बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले, तर दुसरी विकेट झुलन गोस्वामीच्या खात्यात राहिली. झुलनने एकाच्या वैयक्तिक स्कोअरवर ब्युमॉंटला LBW आऊट केले. झुलनने या विक्रमामध्ये ऑस्ट्रेलियाची माजी वेगवान गोलंदाज कॅथरीन फिट्झपॅट्रिक आणि वेस्ट इंडिज संघाची अनिसा मोहम्मद यांना मागे टाकले आहे.
Jhulan Goswami now has 250 wickets in ODIs ????
What a player!#CWC22 pic.twitter.com/0bLllvlUbg
— ICC (@ICC) March 16, 2022
चकडा एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या झुलन गोस्वामीने याआधी महिला विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रमही केला आहे. या विक्रमात तिने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर लिन फुलस्टनला मागे टाकले होते. झुलनने वर्ल्ड कपमध्ये ४१ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- शरद पवार आणि संजय राऊतांची बंद दाराआड २० मिनिटे चर्चा!
- Women’s WC 2022: भारतीय संघाने गमावला वर्ल्डकपमध्ये दुसरा सामना; केवळ १३४ धावांवर परास्त
- “सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की”- चंद्रकांत पाटील
- “काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरेंना माहिती, नुसतं टॅक्स-फ्री…”, संजय राऊतांची टीका
- वीज जोडणीची अंमलबजावणी सुरु; महावितरणच्या कंपन्यांना ‘स्टॉप’ चा आदेश जारी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
