अकोला: शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग पिंजरकर (Shrirang Pinjarkar) यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहित आमदार आणि जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील सेनेचे पक्षांतर्गत वाद उफाळून आले आहेत.
पत्रात नेमके काय म्हटले आहे?
दरम्यान श्रीरंग पिंजरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहित म्हटले आहे की, “आमदार नितीन देशमुख हे खंडणीखोर असून जिल्ह्यात काम करणारे अधिकारी आणि कंत्राटदार नितीन देशमुखांना धास्तावले आहेत. नितीन देशमुख हे चार पक्ष बदलून आले आहेत. देशमुख आधी वंचित बहुजन आघाडीत नंतर जनसुराज्य पार्टीत होते. भाजपच्या पाठिंब्यावर बाळापूर मतदारसंघात पराभूत झाले. नंतर काँग्रेस, अपक्ष असा सारा प्रवास करून शिवसेनेत आलेत. बाजोरीया निवडणुकीत उभे असताना त्यांच्या विरोधात काम केले. असे असले तरी निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याचं ते कार्य करत आहेत. असा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.
दरम्यान विधान परिषद निवडणुकीत गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) यांचा पराभव झाला. आणि येथूनच शिवसेनेतील मतभेद समोर येत आहे. दरम्यान नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात यावी तसेच पक्षांतर्गत नव्याने निवडणुका घेण्यात याव्या, अशी मागणीही श्रीरंग पिंजरकर यांनी लिहिलेल्या पत्रात करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- शरद पवार आणि संजय राऊतांची बंद दाराआड २० मिनिटे चर्चा!
- Women’s WC 2022: भारतीय संघाने गमावला वर्ल्डकपमध्ये दुसरा सामना; केवळ १३४ धावांवर परास्त
- “सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की”- चंद्रकांत पाटील
- “काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरेंना माहिती, नुसतं टॅक्स-फ्री…”, संजय राऊतांची टीका
- वीज जोडणीची अंमलबजावणी सुरु; महावितरणच्या कंपन्यांना ‘स्टॉप’ चा आदेश जारी!


