🕒 1 min read
मुंबई: महिला विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बुधवारी माऊंट मौनगानुई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडने भारतीय महिला संघाचा ४ गडी राखून पराभव केला. मिताली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ फलंदाजीत फारसे काही करू शकला नाही आणि ३४ षटकात १३४ धावा करून सर्वबाद झाला. यानंतर इंग्लिश संघाने ३१ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले.
इंग्लंडकडून हीदर नाइटने शानदार फलंदाजी दाखवत नाबाद अर्धशतक झळकावले, तर फिरकीपटू शार्लोट डीनने दमदार कामगिरी करत ४ बळी घेतले. हीथर नाइट ७२ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने नाबाद ५३ धावा करून माघारी परतली. अशाप्रकारे सध्या सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडच्या महिला संघाने पहिला विजय नोंदवला. याआधी सलग ३ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी मिताली राजच्या (mitali raj) नेतृत्वाखालील भारतीय संघाला ४ सामन्यांमध्ये दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे . यापूर्वी त्यांनी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजचा पराभव केला होता, तर यजमान न्यूझीलँडकडून पराभूत झाले होते.
England register their first win of #CWC22 ????
They defeat India by four wickets to keep their campaign alive! pic.twitter.com/6zYzwS4mQG
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) March 16, 2022
झालेल्या सामन्यात केवळ भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मेघना सिंगने ३ विकेट पटकावत भारतीय संघाकडून लढा दिला. तर १ विकेट मिळालेल्या झुलन गोस्वामीने एक विक्रम नोंदवला. महिला क्रिकेट मध्ये एकदिवसीय सामन्यात २५० विकेट्स घेणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.
महत्वाच्या बातम्या
- “सगळ्यांचं पीठ होणार हे नक्की”- चंद्रकांत पाटील
- “काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरेंना माहिती, नुसतं टॅक्स-फ्री…”, संजय राऊतांची टीका
- वीज जोडणीची अंमलबजावणी सुरु; महावितरणच्या कंपन्यांना ‘स्टॉप’ चा आदेश जारी!
- “अजून १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार…”- चंद्रकांत पाटील
- IPL 2022: हार्दिक पंड्यासह दिसणार राहुल तेवतिया; संघातील भूमिका केली स्पष्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
