Share

सत्ता जाताच नवज्योत सिंग सिद्धूंचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; म्हणाले…

Published On: 

चंदीगड: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबमधील सत्ता जाताच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या पाचही राज्यातील प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे मागितले होते. त्यानुसार सिद्धू यांनी राजीनामा दिला असल्याचे सांगितले आहे.

हायकमांडच्या इच्छेनुसारच राजीनामा देत असल्याचं सिद्धू यांनी म्हटलं आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितलं होतं. प्रदेश कमिट्यांचे पुनर्गठन करण्यासाठी हे राजीनामा मागण्यात आल्याचं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं होतं. त्यामुळे आता उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडच्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचेही राजीनामे एक दोन दिवसात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून त्यांनी राजीनामा दिला असल्याचं म्हटलं आहे. सिद्धूंना गेल्यावर्षी जुलैमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं होतं. काँग्रेस पक्षाच्या हायकमांडची जशी इच्छा होती तेच मी केलंय, असं ट्विट करत सिद्धू यांनी आपलं राजीनामा पत्रंही पोस्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!