Share

रशियाने युक्रेनवरील हल्ले केले आणखी तीव्र; गोळीबारासह हवाई हल्ले

Published On: 

🕒 1 min read

कीव: रशिया युक्रेन युद्धाचा आज 18 वा दिवस आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबण्याऐवजी वाढतच आहे. रशियन सैन्य सतत हल्ले करत आहे. युक्रेनची शहरे जळत आहेत. सततच्या गोळीबारामुळे सरकारी इमारती आणि घरे उद्ध्वस्त झाल्याची परिस्थिती आहे. या परिस्थितीवर महापौर रुस्लान मार्टसिंकिव म्हटले आहे की रशियन सैन्याने 13 मार्च रोजी इव्हानो-फ्रँकिव्हस्क एअरबेसवर हल्ला केला. रशियाकडून सलग दुसऱ्या दिवशी एअरबेसला लक्ष्य करण्यात आले आहे. एअरबेसजवळ राहणाऱ्यांना इतर ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच कीवमधील ग्रीन कॉरिडॉरमधून सुटका करणाऱ्या महिला आणि मुलांवर रशियन सैनिकांनी गोळीबार केला, त्यात एका लहान मुलासह 7 जणांचा मृत्यू झाला.

युक्रेनवर रशियाचा हल्ला सुरूच आहे. दरम्यान स्थानिक अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार रशियन सैन्याने पश्चिम युक्रेनियन शहर ल्विव्हच्या बाहेरील लष्करी प्रशिक्षण केंद्रावर अनेक हवाई हल्ले केले. या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 57 जण जखमी झाले आहेत. तसेच ल्विव आणि खेरसनमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकल्याचा दावाही करण्यात आला आहे. ल्विव प्रादेशिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार रशियन सैन्याने 13 मार्च रोजी ल्विव ओब्लास्टमधील इंटरनॅशनल सेंटर फॉर पीसकीपिंग आणि सिक्युरिटी मिलिटरी ट्रेनिंग बेसवर सुमारे आठ क्षेपणास्त्रे डागली होती. मात्र जीवितहानीबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या संदर्भात भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!