Share

“फुंकर घालून पणती विझते, वणवा नाही”, फडणवीसांच्या मुद्द्यावरुन भातखळकरांचे टीकास्त्र

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील पोलिसांच्या बदल्यांची गोपनीय माहिती उघड केल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी त्यांची पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे. फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आल्याने आज राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. तसेच सागर बंगल्याबाहेर देखील भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘फुंकर घालून पणती विझते, वणवा नाही, हे कुणीतरी ठाकरे सरकारला सांगा. चाललेत देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करायला’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘ठाकरे सरकारच्या वसुलीबाज मंत्र्यांच्या विरोधात ठोस पुरावे असताना राज्यात कुठे गुन्हाही दाखल करता येत नाही अशी परिस्थिती आहे. पण भ्रष्टाचाराविरुद्ध बोलणाऱ्यांची चौकशी होते. जनता सर्व बघते आहे.’

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!