Share

Women’s World Cup: मॅडी ग्रीनचा ‘हा’ झेल एकदा पहाच; समालोचकासह प्रेक्षकही झाले आश्चर्यचकित

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला विश्वचषकातील ११ वा सामना वेलिंग्टन येथे खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाने यजमान न्यूझीलंडसमोर २७० धावांचे लक्ष्य ठेवले होते. सामन्यादरम्यान न्यूझीलंड संघाची खेळाडू मॅडी ग्रीनने ऑस्ट्रेलियन फलंदाज एलिसा पेरीचा सुपरमॅन सारखा कॅच पकडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पेरीने या सामन्यात ६८ धावांची सर्वाधिक खेळी केली.

मॅडी ग्रीनने ४५ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हा झेल घेतला. ताहलिया मॅकग्रा सोबत शतकी भागीदारी करणारी एलिस पेरी आक्रमक पद्धतीने फलंदाजी करताना दिसली. तिने आपले अर्धशतक पूर्ण केले होते. आणि शेवटच्या षटकांमध्ये ती पॉवर हिटिंग मूडमध्ये होती. ४५ व्या षटकात, ली तैहूच्या शेवटच्या चेंडूवर पेरीने लाँग ऑनच्या दिशेने मोठा फटका मारून धाव घेण्याचा प्रयत्न केला. मॅडी ग्रीन तिच्या उजवीकडे धावली आणि हवेत जबरदस्त उडी मारत नेत्रदीपक झेल घेतला. हा अप्रतिम झेल पाहिल्यानंतर समालोचकांसह प्रेक्षकही अवाक् झाले आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.

एलिसा पेरी बाद झाल्यानंतर अॅशले गार्डनरने जबाबदारी घेतली. गार्डनने १८ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४८ धावांची झंझावात खेळी करत. संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. एक वेळ अशी होती जेव्हा ऑस्ट्रेलियाने ३० व्या षटकात ११३ धावांवर ४ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कांगारू संघ अडीचशे धावांचा टप्पा पार करू शकेल, असे वाटत नव्हते. पण पेरी, ताहलिया आणि गार्डनर यांच्या खेळीमुळे ते शक्य झाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!