मुंबई : अभिनेत्री कंगना रणौतचा ‘लॉक अप’ शो सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. या शोमधील सदस्य लॉकअपमध्ये त्यांच्या आयुष्यातील भूतकाळ तसेच चांगले किंवा वाईट अनुभव एकमेकांसोबत शेअर करताना दिसतात.या शोमध्ये असलेल्या ट्रान्सवूमन सायशा शिंदेनेही तिच्या बॉयफ्रेंडबद्दल काही धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला होता. त्यानंतर राजनीती तज्ञ आणि उद्योजक तेहसीन पूनावालाने सायशाला अॅविक्शनपासून वाचवण्यासाठी एक डार्केस्ट सिक्रेट सांगावं लागलं. त्यामुळे सायशाने ही एक सिक्रेट सांगितलं.
सायशाने यावेळी जो खुलासा केला, ते ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काबसला. एवढंच काय तर कंगनाला ही आश्चर्य झाले. सायशा १० वर्षांची असताना तिच्या कुटुंबातील एक सदस्याने तिचा विनयभंग केला होता. या विषयी सांगताना सायशा म्हणाली, “१० वर्षांची असताना माझ्या घरातील एका सदस्याने माझा विनयभंग केला होता. ती व्यक्ती माझ्या जवळच्या नातेवाईकांपैकी एक होती. ती व्यक्ती माझ्याहून काही वर्षांनीच मोठी होती. प्रश्न हा होता की ते काही वर्षांनी माझ्याहून मोठे आहेत, तर तो विनयभंग होता का? काही वर्षांनी मी मोठी झाले आणि मला जाणवलं की तो विनयभंग होता.”
View this post on Instagram
हे ऐकल्यानंतर कंगनाने सायशाला विचारले की “त्या व्यक्तीशी तिने कधी यावर चर्चा केली का?” यावर उत्तर देत सायशा म्हणाली की, “मी कधीच या विषयी त्या व्यक्तीशी चर्चा केली नाही. मला असं वाटतं की मी त्यांना काही हिंट्स दिल्या असा त्या व्यक्तीला वाटलं असेल. आता ही गोष्ट समोर आलीच आहे तर त्या व्यक्तीला या विषयी कळलं असेल.”
पुढे सायशा म्हणाली, “स्वप्नील आणि सायेशा या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत हे त्या व्यक्तीला कळावे अशी तिची इच्छा आहे. लिंग बदलण्यापूर्वी सायशाचे नाव स्वप्नील शिंदे होते.” सायशा म्हणाली की, “अशा मुद्द्यांवर बोलताना मला कोणताही संकोच वाटत नाही. पण ती त्या व्यक्तीचे नाव उघड करू शकत नाही कारण ती व्यक्ती कुटुंबातील आहे.”
महत्वाच्या बातम्या :


