Share

“प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं…”- छगन भुजबळांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात नेत्यांचे फोन बेकायदेशीर रित्या टॅप केल्या प्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना नोटीस बजावण्यात आली आहे. या संबंधी फडणवीसांचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिस सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. याविरोधात राज्यभरात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, महाविकास आघाडी सरकारविरोधात आंदोलन सुरू केले आहे. शिवाय, फडणवीसांना आलेल्या नोटीशीवरून राज्य सरकारचा निषेधही नोंदवला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली असून, भाजपवर टीका केली आहे.

“प्रत्येक गोष्टीचं राजकीय भांडवल करायचं हे आता भाजपाने ठरवलं आहे, असं दिसतय. असा त्रास देण्याचं अटक करण्याचं काम, ईडी, सीबीआय, आयकर विभाग याचा पुरेपूर उपयोग ते करतात. इथे मात्र साधं पोलीस चौकशीला देखील जायचं नाही आणि तिकडे मात्र वाटेल तसं कायदेशीर, बेकायदेशीर आरोप लावायचे, आतमध्ये टाकायचं आणि नंतर मग जा तुम्ही कोर्टात आणि या सुटून.” अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!