Share

“मविआ सरकारने पोलिसांचा गैरवापर करीत…”, केशव उपाध्येंची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यातील पोलिसांच्या बदल्यांची गोपनीय माहिती उघड केल्या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना नोटीस पाठविण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी त्यांची पोलीस पथकाकडून चौकशी सुरू आहे. फडणवीस यांना नोटीस पाठवण्यात आल्याने आज राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले आहे. तसेच सागर बंगल्याबाहेर देखील भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजप नेते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात केशव उपाध्ये यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘महावसुली आघाडी सरकारने पोलिसांचा गैरवापर करीत विरोधकांना संपविण्याचा प्रयत्न केला तरी ना जनता शांत बसणार ना देवेंद्रजी भ्रष्ट्राचार काढण्याच थांबणार’, असे उपाध्ये म्हणाले आहेत. तसेच #ISupportDevendra या हॅशटॅगचाही त्यांनी वापर केला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्ष्यांना राज्य सरकारच्या षडयंत्राचे पुरावे असलेला पेनड्राईव्ह दिला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे बघायला मिळाले. तद्पश्चात फडणवीसांना पोलिसांनी नोटीस पाठवली त्यानंतर भाजप नेते आक्रमक झाले असून आज राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!