Share

“भाजपच्या जन्माआधी शिवसेनेचे वाघ…”; संजय राऊतांच देवेंद्र फडणवीसांना सडेतोड उत्तर

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त काल (२३ जानेवारी) उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा जोरदार समाचार घेतला होता. “शिवसेना जन्माला येण्यापूर्वीच मुंबईत आमचे नगरसेवक आणि आमदार होते. १९८४ मध्ये तुम्ही भाजपच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढवली. मनोहर जोशी हे भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढले होते”, असे फडणवीस म्हणाले होते. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.

संजय राऊत म्हणाले, “भाजपच्या जन्म तारखेचा दाखला देवेंद्र फडणवीसांनी आणावा. जनता पक्षाचे पतन झाल्यावर १९८० च्या दशकात भाजपचा जन्म झाला आहे. तर शिवसेनेचा जन्म हा १९६९ साली झाला. शिवसेनेचा पहीले महापौर मुंबईमध्ये डॉ हेमचंद्र गुप्ते हे कधी झाले. त्यावेळी आमचे किती नगरसेवक निवडून आले होते. या संदर्भातील एक अभ्यास शिबीर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठाणमध्ये ठेऊ. कोणाला त्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर ते येऊ शकतात. शिवसेनेते पहिले आमदार वामनरान महाडिक देखील त्याच काळात निवडणून आले. भाजपच्या जन्माआधी आमचे वाघ मुंबईतून निवडून आलेले आहेत. देवेंद्र फडणवीसांचा तेव्हा मुंबईशी, महाराष्ट्राच्या राजकारणाशी सबंध नसेल कारण या सर्व गोष्टी फडणवीस यांच्या जन्माआधीच्या आहेत.”

बाळासाहेब ठाकरेंची साक्ष

राम जन्मभूमी आंदोलनामध्ये फक्त भाजपचा सहभाग होता शिवसेनेचा नव्हता, या देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणाले, “कोणी काहीही म्हटलं तरी इतिहास आहे, दस्ताऐवज आहे. साक्षी पुरावे आहेत. बाळासाहेब ठाकरेंची साक्ष आहे. शिवसेना नेत्यांना त्यामध्ये गुन्हेगार केलं होतं. शेकडो कारसेवक मुंबईतून गेले. त्याला कोणताही राजकीय पक्ष त्यावेळी नव्हता. त्या काळातला सामना पाहिला तर कारसेवकांची यादी आम्ही दिली आहे.”

औरंगजेबाला कवटाळून बसला होता का?   

आम्ही प्रयागराज नाव आम्ही करुन दाखवल उस्मानाबाद, औरंगाबदच काय?, फडणवीसांच्या या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “आपणही पाच वर्षे मुख्यमंत्री होता. तेव्हा औरंगजेबाला कवटाळून बसला होता का? एखाद्या शहराचे नाव बदलायचं असेल तर केंद्र सरकारची परवाणगी लागते. राज्य सरकार यासाठी प्रयत्न करत आहे पण केंद्राने याला का मंजूरी दिली नाही. हे विचारावं लागेल. जसं योगींनी प्रयागराज करून घेतले तसे देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादच संभाजीनगर का करुन घेतलं नाही?, हा मोठा प्रश्न आहे.”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!