Share

“बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसता”, फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Published On: 

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल शिवसैनिकांशी संवाद साधताना राम मंदिर, २५ वर्ष युतीवरून भाजपला चांगलेच फैलावर धरले. तर यावरच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीवरून टीकेची झोड उठवली.

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोदींपासून शहापर्यंत आणि फडणवीसांपर्यंत सर्वांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून अभिवादन केलं. पण सोनिया गांधी, प्रियंका आणि राहुल गांधी यांनी अभिवादनाचं साध ट्विटही केलं नाही. आघाडीत असूनही त्यांनी अभिवादन केलं नाही. आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही. तरी तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही. ज्यांना बाळासाहेबांना अभिवानद करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता?अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तसेच मुख्यमंत्री यांच्या हिंदुत्वावरील वक्तव्यालाही फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राम मंदिर-बाबरी सोडून द्या. मोदींनी करून दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात अयोध्येत राम मंदिर तयार होत आहे. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. तुमचा हिंदुत्वाशी संबंध काय? तुमचा मुख्यमंत्री असताना तुम्ही मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही. आताही सोडवत नाही. तुमचं हिंदुत्व कागदावर आहे. औरंगाबादचं संभाजी नगरही केलं नाही. आम्ही प्रयागराज करून दाखवलं. हिंदुत्व हे बोलून दाखवायचं नसतं करून दाखवायचं असंत. असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!