Share

“कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार”, महावितरणच्या थकबाकीवरून भातखळकरांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : मागील काही दिवसांपासून महावितरण तोट्यात असून नगरविकास आणि ग्रामविकास खात्याकडे तब्बल ८ हजार कोटींची थकबाकी थकली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्य अंधारात गेलं तर फक्त काँग्रेस जबाबदार राहणार नाही, तर संपूर्ण महाविकास आघाडी जबाबदार राहिल, असे वक्तव्य राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत(Nitin Raut) यांनी केले आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात भातखळकरांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’शिवसेना, राष्ट्रवादीच्या खात्यांकडे ८ हजार कोटी थकले असून तेच महावितरणच्या संकटाचं कारण असल्याचे उघड करत नितीन राऊतांनी आघाडीलाच शॉक दिला आहे. कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे. त्याची शिक्षा मात्र गोरगरीब जनतेला आणि शेतकऱ्यांना वीज कापून दिली जातेय’, असे भातखळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, याविषयी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना नितीन राऊत म्हणाले की,’राज्यात महावितरणची स्थिती अत्यंत वाईट असून राज्य सरकारच्या नगरविकास, ग्रामविकास खात्याकडे बाकी असेलेली थकबाकी त्यांनी महावितरणला दिलेली नाही, त्यामुळे महावितरण संकटात आहेत. राज्य अंधारात गेलं तर फक्त काँग्रेस जबाबदार राहणार नाही, तर संपूर्ण महाविकास आघाडी जबाबदार राहिल, त्यामुळे राज्य सरकारने महावितरणला निधी द्यावा’,असे राऊत म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!