मुंबई : ‘सरदार उधम’ (Sardar Udham) या चित्रपटाच्या माध्यमाने विकी कौशलने (Vicky Kaushal) चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाला. त्या चित्रपटात केलेली दमदार भूमिका त्याच्या चाहत्यांच्या मनात घर करून गेली आहे. विकीने आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत (katrina kaif) लग्न केल्यापासून सगळ्यात जास्त चर्चेतला चेहरा बनला आहे. त्याच्या लग्नात बिझी होता. आता काही चित्रपटांची शुटिंग अद्याप बाकी असून एका रिपोर्टनुसार विकी आपल्या बहुचर्चित ‘सैम बहादुर’ (Sam Bahadur) या चित्रपटाची शुटिंग मार्च महिन्यात करणार असल्याचं बोललं जात आहे. गेल्यावर्षी या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज करण्यात आला.
दरम्यान ‘सैम बहादुर’ या चित्रपटाचे पहिला लुक रिलीज करण्यात आला होता. त्यावेळी तो चाहत्यांना प्रचंड आवडला होता. तसेच हा चित्रपट कधी पाहायला मिळेल याची उत्सुकता विकीच्या चाहत्यांमध्ये पहायला मिळत आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आत्तापर्यंत अनेक चित्रपट रेंगाळल्यानंतर आता पुन्हा शुटिंगला सुरूवात केल्यानंतर ‘सैम बहादुर’ या चित्रपटाची शुटिंग मार्च महिन्यात होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
https://www.instagram.com/p/CB77hiDJV8F/?utm_source=ig_web_copy_link
एका माहितीनुसार, मार्च महिन्यात विकीच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण होणार आहे. त्यामध्ये ‘सैम बहादुर’ (Sam Bahadur) याचाही समावेश आहे. तसेच नितेश तिवारी यांच्याही एका चित्रपटाचं शुटिंग मार्च महिन्यात होणार आहे, त्यामध्ये वरूण धवन आणि कार्तिक आर्यन हे सुध्दा मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटासाठी विकी स्वत: खूप उत्साहीत असून चाहत्यांना देखील तितकाच आनंद झाल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या:
- “साधा मलंगगडचा प्रश्न यांच्याने सुटत नाही आणि हिंदुत्वाच्या गप्पा करतात”, फडणवीसांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
- सिल्लोड येथील बाळासाहेब ठाकरेंचे स्मारक शिवसैनिकांना प्रेरणा देणारे शक्तीस्थळ ठरेल-अब्दुल सत्तार
- मेकअप सुरू असताना अभिनेत्री सारा अली खानसोबत घडली अशी भयावह घटना
- “इंदिरा गांधी पंतप्रधान असताना…”; बाळासाहेब ठाकरे, शरद पवारांचे उदाहरण देत भुजबळांनी टोचले पटोलेंचे कान

