मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP President Sharad Pawar Corona Positive) यांना कोरोनाची लागण झाली असून शरद पवारांनी स्वतः ट्वीट करत याविषयीची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना खबरदारी घेण्याचे आणि चाचणी करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे(Dhananjay Munde) यांनी शायरीच्या माध्यमातून शरद पवार यांना कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी धीर दिला आहे. तसेच काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.
यासंदर्भात धनंजय मुंडे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,’चल रहा युद्ध हो, वक्त भी विरुद्ध हो। फिर भी आपको लढना है, क्युंकी आपकी पहचान एक ‘योद्धा’ है। शरद साहेब लवकर बरे व्हा आणि काळजी घ्या’, असे मुंडे म्हणाले आहेत.
चल रहा युद्ध हो,
वक्त भी विरुद्ध हो।
फिर भी आपको लढना है,
क्युंकी आपकी पहचान एक 'योद्धा' है।@PawarSpeaks साहेब, लवकर बरे व्हा; काळजी घ्या !!#GetWellSoon #PawarSaheb https://t.co/ALRrkfK5i2— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 24, 2022
दरम्यान, ‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी उपचार घेत आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती की, त्यांनी योग्य चाचण्या करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी’,असे ट्वीट शरद पवारांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
-
“मुख्यमंत्री ठाकरे काल जनतेसमोर आले अन् विरोधकांचे धाबे दणाणले”
-
“शिवसेना जन्माला येण्यापूर्वीच मुंबईत आमचे…”, ठाकरेंच्या वक्तव्यावर फडणवीसांचे टीकास्त्र
-
“कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार”, महावितरणच्या थकबाकीवरून भातखळकरांचा हल्लाबोल
-
वामिकाचे फोटो व्हायरल होताच विराटने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला..

