Share

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने चारली ‘मविआ’ला धूळ

Published On: 

सिंधुदुर्ग : जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचा निकाल नुकताच हाती आला आहे. ही निवडणूक भाजप नेते नारायण राणे यांनी जिंकली असून महाविकास आघाडीला धूळ चारली आहे. नारायण राणे आणि शिवसेनेसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष निकालाकडे लागले आहे. महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल तर भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समृद्धी पॅनल रिंगणात होते.

या निवडणुकीत एकूण ९८ .६७ टक्के मतदान झाले होते. १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात होते. ९८१ पैकी ९६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी तीन राऊंडमध्ये ८ टेबलांवरती एकाच वेळी करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली गेली. एकूण १९ जागांपैकी १० जागा भाजपने जिंकल्या आहेत.

हे आहेत विजयी उमेदवार

भाजपचे विजयी उमेदवार प्रकाश बोडस, दिलीप रावराणे, मनीष दळवी, महेश सारंग, अतुल काळसेकर, विठ्ठल देसाई, बाबा परब, समीर सावंत, गजानन गावडे हे उमेदवार विजयी झाले आहेत. तर महाविकास आघाडीचे सुशांत नाईक, गणपत देसाई, विद्याप्रसाद बांदेकर हे विजयी झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!