Share

“छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचा निषेध करणे देशद्रोह कसा?”, संजय राऊतांचा सवाल

Published On: 

मुंबई : कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाली. या घटनेविरोधात बेळगावात मराठी तरुणांनी आंदोलन केले. त्यानंतर कर्नाटक पोलिसांनी ३८ तरुणांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. राजकारण करायचं असेल तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी महाराजांचे नाव घेतात. तर दुसरीकडे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरील हल्ल्याचा निषेध केल्यावर भाजप शासित राज्यांमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्यांनतर आंदोलने झाली. ठीक आहे गुन्हे दाखल करु शकता तुम्ही. पण देशद्रोहाचा गुन्हा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा निषेध केल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोह. अपमाणाचा निषेध करणे हा देशद्रोहासारखा गुन्हा होऊ शकतो का? भाजपशासित राज्यात देशद्रोहाचा गुन्हा इतका स्वस्त झाला का? असा सवाल संजय राऊतांनी केला.

माणसाचं मन भरकटलं की माणसं गांज्या पिल्यासारखं बोलतात. सुधीर मुनगंटीवार यांना मी अत्यंत सयंमी नेते समजत होतो. भाजपच्या नेत्यांना कुठेतरी शांतपणे केदारनाथला वैगरे जाऊन एक महिना बसण्याची गरज आहे. नंतर परत महाराष्ट्रात येऊन त्यांनी राजकारण करावं. सध्या त्यांची मनस्थिती चांगली नाहीये, बरी नाहीये, आणि त्यांच मनस्वास्थ ठिक व्हावं म्हणून मी नव्यावर्षाची पार्थना करतो. असेही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!