Share

ऐतिहासिक कामगिरी; 113 धावांनी विजय मिळवत टीम इंडियाने मालिकेत घेतली आघाडी

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळला गेला. सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारताने दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी पराभव केला. याआधी या मैदानावर दक्षिण आफ्रिकेचा विक्रम चांगलाच होता. याआधी या क्रिकेट मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आतापर्यंत २६ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी २१ सामने जिंकले आहेत. केवळ 2 सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह भारत सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा तिसरा संघ ठरला आहे.

दक्षिण आफ्रिकेने नोव्हेंबर 1995 मध्ये सेंच्युरियन येथे पहिली कसोटी खेळली होती. इंग्लंडविरुद्धची ही कसोटी अनिर्णित राहिली. गेल्या 26 वर्षात दक्षिण आफ्रिकेने येथे 26 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 21 समाने संघ जिंकला, 2 मध्ये पराभूत झाला. ३ सामने अनिर्णित राहिले. येथे फक्त इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्यात यश आले आहे. इंग्लंडने जानेवारी 2000 मध्ये येथे केवळ दोन गडी राखून रोमांचक विजय नोंदवला होता. त्याचवेळी ऑस्ट्रेलियाने 6 वर्षांपूर्वी येथे दक्षिण आफ्रिकेचा 281 धावांनी पराभव केला होता. आता सेंच्युरियनमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करणारा भारत हा तिसरा संघ ठरला आहे.

याआधी भारतीय संघ सेंच्युरियनमध्ये दोन कसोटी सामने खेळला होता. भारताने हे दोन्ही सामने 2010 आणि 2017/18 मध्ये खेळले. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला होता. 2010 मध्ये झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा एक डाव आणि 25 धावांनी पराभव केला होता. त्याच वेळी, 2017/18 मध्ये याच मैदानावर झालेल्या सामन्यात यजमानांनी भारताचा 135 धावांनी पराभव केला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!