सिंधुदुर्ग : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक ३० डिसेंबर रोजी पार पडली. एकूण ९८.६७ टक्के मतदान झाले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनल तर भाजप पुरस्कृत सिद्धिविनायक समृद्धी पॅनल रिंगणात आहेत. शिवसेनेच्या ताब्यात असलेली ही बँक कोणाच्या ताब्यात जाणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. आज सकाळीच मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या राऊंडमध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून सतीश सावंत पराभूत झाले आहेत. भाजपचा ९ तर महाविकास आघाडीचा ५ जागांवर विजय झाला आहे.
जिल्हा बँकच्या १९ जागांसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहेत. आज सकाळीच मतमोजणीला सुरु झाली असून राणे आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माध्यमिक शिक्षक पतपेढीत ही मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत ९८१ पैकी ९६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणी तीन फेऱ्यामध्ये आठ टेबलांवर एकाच वेळी होत आहे. दुसऱ्या टप्प्यात महिला उमेदवारांची मतमोजणी केली जाईल. मतमोजणीचा निकाल यायला जवळपास दीड ते दोन तास लागण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँक २००८ ते २०१९ पर्यंत तब्बल ११ वर्ष राणेंच्या ताब्यात होती. मात्र २०१९ साली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेली. तब्बल अकरा वर्षांपासून राणे यांच्या हाती सत्ता असलेली बँक शिवसेनेच्या ताब्यात गेल्यामुळे राणे यांनी ही निवडणूक पूर्ण ताकदीनिशी लढवलेली आहे. तर २०१९ साली सत्ता काबीज केल्यानंतर यावेळीदेखील सत्ता कायम राखण्याचे लक्ष ठेवून शिवसेना अर्थात महाविकास आघाडीने पूर्ण क्षमतेने प्रयत्न केले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक नेमकं कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो की, शिवराय नसते तर तुमचीही सुंताच झाली असती’
- राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु; जाणून घ्या काय आहेत नवे निर्बंध
- “…अशी शैली माजी पंतप्रधानांमध्ये नव्हती”; शरद पवारांनी केले मोदींचे कौतुक
- यूपी योद्धाने गुजरात जायंट्सशी साधली बरोबरी, सामना अनिर्णित
- पंतप्रधान मोदींबाबत शरद पवारांचे मोठे विधान म्हणाले, “यूपीए सरकारमध्ये दुसरा मंत्री नव्हता जो…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

