मुंबई : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सुरवात अतिशय तापलेल्या वातावरणामध्ये झाली. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली. यावरुन सभागृहामध्ये मोठा गदारोळ झाला आणि सभागृहाचे कामकाज तहकूब केले होते. राज्यातील विजेच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केल्यानंतर गदारोळ झाला आणि विरोधकांनी भास्कर जाधवांच्या निलंबनाची मागणी केली होती.
काही वेळाने सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु केल्यानंतर भास्कर जाधवांनी माफीही मागितली. मात्र हा वाद अद्यापही थांबलेला नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत भास्कर जाधवांवर निशाणा साधला आहे. भास्कर जाधवांनी केलेल्या नकलीवरुन प्रश्न विचारला असता राणे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. ‘पंतप्रधानांवर कोण बोलले तर ऐकून घेणार नाही, नक्कल केली तर सेम तसंच उत्तर देऊ, भाजपमध्येही नकलाकार आहेत. आज ना उद्या आम्ही उत्तर देऊच. ते कशा स्वरुपात असेल हे माहिती नाही’, असे नारायण राणे यांनी ठणकावले आहे.
विधीमंडळात सदस्यांचे वर्तन कसे असावे याबाबत गांभिर्याने चर्चा झाली याबाबत बोलताना नारायण राणे यांनी भास्कर जाधव हे नाचे असल्याची टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. ‘कोकणात काही भागात नाचे आहेत. ते होळीच्या वेळी पैसे घेऊन नाचतात. त्यातला तो प्रकार त्या दिवशी सभागृहामध्ये झाला’ असे नारायण राणे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- “आदित्य ठाकरेंचा आवाज मांजरीसारखा आहे का? वाघाची मांजर कधी झाली?”
- कोण अजित पवार? मी नाही ओळखत; नारायण राणे आक्रमक
- आपण कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही; अजित पवारांनी आमदारांना खडसावलं
- रुईकर कुटूंबियांना शिवसेनेतर्फे ५ लाखाची मदत; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी घेतली कुटुंबियांची भेट!
- असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये; खडसे हल्ला प्रकरणी चाकणकरांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
