🕒 1 min read
मुंबई : राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये ‘म्याव म्याव’ हा विषय सर्वात जास्त चर्चेचा ठरला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी विधानभवनाच्या पायरीवर बसलेले असताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवनात प्रवेश करत असताना त्यांच्याकडे पाहून म्याव म्याव असा आवाज काढला. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद सुरु झाला तो अद्यापही संपलेला नाही.
आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेतून सत्ताधाऱ्यावर ताशेरे ओढले आहेत. ‘आदित्य ठाकरेंचा (Aditya Thackeray) आवाज मांजरीसारखा आहे का? शिवसेनेच्या वाघाची मांजर कधी झाली? असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे.
नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या मांजरीसारख्या आवाजावरून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता नारायण राणे चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. शिवसेना नितेश राणेंना अटक करण्यासाठी सूडभावनेने वागत असल्याचा आरोपही नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला आहे.
नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढण्यावरून नारायण राणे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मांजराचा आवाज कोण काढते? ज्यामुळे चिडले. आदित्य ठाकरेंचा मांजरेचा काही संबंध आहे का? वाघाची मांजर कधी झाली? आदित्य ठाकरे जात असताना कुणी म्याव म्याव असा आवाज काढला. आदित्य ठाकरेंचा आवाज तसा आहे का? ते तसं बोलतात का? मांजरीचा आवाज काढला तर राग का यावा, असे नारायण राणे म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- कोण अजित पवार? मी नाही ओळखत; नारायण राणे आक्रमक
- आपण कुत्री, मांजर आणि कोंबड्यांचं प्रतिनिधीत्व करत नाही; अजित पवारांनी आमदारांना खडसावलं
- रुईकर कुटूंबियांना शिवसेनेतर्फे ५ लाखाची मदत; शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी घेतली कुटुंबियांची भेट!
- असे भ्याड हल्ले करणारे निर्दोष सुटता कामा नये; खडसे हल्ला प्रकरणी चाकणकरांची प्रतिक्रिया
- “…तरीही राज्यपाल अडथळा आणत असतील तर त्यांच्यावर दबाव आहे”, संजय राऊतांचा हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
