Share

भास्कर जाधवांनी केली पंतप्रधान मोदींची नक्कल; म्हणाले…

Published On: 

मुंबई : राजकारणात अनेकदा नेतेमंडळी एकमेकांची नक्कल अर्थातच मिमिक्री करून खिल्ली उडवतांना दिसतात. अशीच नक्कल सोमवारी(८नोव्हें.) रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी करून दाखवली आहे. विशेष म्हणजे भास्कर यांनी थेट पंतप्रधान मोदींची नक्कल केल्यामुळे राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे.

यावेळी भास्कर यांनी पंतप्रधान मोदींची नक्कल करत त्यांच्या वक्तव्यांची खिल्ली उडविली. काँग्रेसने आजपर्यंत काहीच केले नाही, असे मोदी आणि सामान्य नागरिकांकडून म्हटले जात होते. परंतु, लोकांची ही भावना आता बदलली आहे. काँग्रेसने जे करुन ठेवलंय ते विकायचं काम बंद करा आणि तुम्ही काहीतरी करा, असे नागरिक मोदींना सांगत असल्याचे भास्कर यांनी म्हटले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’देशात प्रचंड महागाई झाली आहे. आज घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या किंमती किती वाढल्या आहेत? मध्यंतरी मोदी सरकारने उज्ज्वला गॅस योजना आणली. तेव्हा नागरिक नरेंद्र मोदी फुकट गॅस देत आहेत, म्हणून त्यांच्यामागे धावत सुटले. तेव्हा मी सातत्याने सांगत होतो की, मोदी सरकार गॅस फुकट देत नाही. ते तुमचा विश्वासघात करणार आहेत, अनुदान बंद करतील. एखादा दुकानदार तुम्हाला नंतर पैसे देण्याच्या अटीवर सामान देतो तेव्हा त्याचा अर्थ दुकानदाराने तुम्हाला सामान फुकट नव्हे तर उधारीवर दिले असा होतो. तो तुमच्याकडून सव्याज पैसे घेणार आहे. मोदी सरकारने सामान्यांना घरगुती गॅसवर मिळणारे अनुदान काढून घेतले. या अनुदानामुळे एक वर्ष तुम्हाला गॅस मोफत मिळणार होता. तो अगोदरही मिळत होता. मात्र, मोदी सरकारने हा मोफत मिळणारा गॅस विकत द्यायला सुरुवात करुन लोकांची फसवणूक केली.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!