🕒 1 min read
मुंबई : भाजपचे खासदार वरुण गांधी हे पक्षात नाराज असल्याच्या तुफान चर्चा असतानाच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि खासदार मेनका गांधी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीवरुन राजकारणात अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. मेनका गांधी यांनी जितेंद्र आव्हाडांची भेट का घेतली याचे कारण आता जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करताना अनेकदा अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी मुंबईत पूर्व तसेच पश्चिम उपनगर येथे जमिनीची उपलब्धता होऊ शकते. या जागेवर प्राण्यांच्या मृत्यूनंतर दफनासाठी विशेष व्यवस्था करण्याबाबत सकारात्मक भूमिका असल्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.
प्राण्यांच्या दफनासाठी मुंबईत जागा निश्चित करण्यासंदर्भात खासदार मनेका गांधी आणि माजी खासदार प्रितेश नंदी यांच्यासोबत आयोजित बैठक होती. ‘मुक्या प्राण्यांची सेवा करणे गरजेचे आहे. प्राणी आपली वेदना सांगू शकत नाहीत. रस्त्यावरील गाई, कुत्रे आणि अन्य प्राण्यांसाठी चौकोन पद्धतीने आखणी करून प्राण्यांचे पालन पोषणही करण्यात येईल’, असे, आव्हाड यांनी यावेळी सांगितले आहे.
मानव आणि प्राणी एकामेकांसोबत आनंदाने रहावेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. याकरिता काही खासगी संस्थांचाही सहभाग असणार आहे, असे मेनका गांधी म्हणाल्या असल्याचे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्र सरकार पुन्हा कृषी कायदे आणण्याच्या तयारीत?; केंद्रीय कृषीमंत्र्यांचं धक्कादायक वक्तव्य
- रवी शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचे माजी क्रिकेटरने केले समर्थन
- “माझ्या अनेक मुद्द्यांना मंत्र्यांनी बगल दिली”, प्रविण दरेकरांचा आरोप
- ‘हा सण सर्वांच्या जीवनात आनंद,समाधान,समृद्धी,उत्तम आरोग्य,प्रेम आणि अहिंसा घेऊन येवो’
- कोरोनाचे संकट लवकरच पूर्णपणे दूर व्हावे, हीच प्रभू येशू यांच्याकडे प्रार्थना- चंद्रकांत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
