Share

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून वरुण आणि मनेका गांधी यांना मिळाला डच्चू

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली – आगामी निवडणुका लक्षात घेऊन भाजपने संघटनात्मक काही नवीन नियुक्त्या केल्या आहेत. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कार्यकारिणीसाठी निमंत्रित आणि स्थायी निमंत्रित पदांवर नियुक्त्या केल्याचे जाहीर केले.

भारतीय जनता पक्षाने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. खासदार वरुण गांधी आणि त्यांच्या मातोश्री मनेका गांधी यांची या कार्यकारिणीमधून हकालपट्टी करण्यात आली आहे. सरकारच्या नितीविरोधात आवाज उठवणे वरुण गांधी यांना महागात पडल्याची चर्चा सुरू आहे. नव्या राष्ट्रीय कार्यसमितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, पीयूष गोयल आदींचा समावेश कायम आहे.

वरुण गांधी हे भारतीय जनता पक्षाचे पीलीभीत येथील लोकसभा खासदार आहे. कधीकाळी वरुण गांधी यांना भाजपचा फायर ब्रँड नेता म्हटले जायचे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी तर त्यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा तरुण चेहरा बनवावा अशी मागणीही झाली होती. मात्र अचानक पक्षामधील त्यांचे वजन कमी होत गेले. तसेच गेल्या काही काळापासून वरुण गांधी यांनीही पक्षाला अनेकदा आरसा दाखवण्याचे काम केले. वरुण गांधी यांच्या या बंडखोर वृत्तमुळेच त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पंकजा मुंडेंना यापूर्वीच राष्ट्रीय कार्याकारिणीत घेण्यात आले आहे. आता, चित्रा वाघ यांनाही संधी देण्यात आली आहे. भाजपची ८० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी समिती जाहीर करण्यात आली असून महाराष्ट्रातील 8 नेत्यांना संधी मिळाली आहे. महाराष्ट्रातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, प्रकाश जावडेकर, विनय सहस्रबुद्धे, चित्रा वाघ यांचा पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, सुनील देवधर यांचा पुन्हा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!