Share

मनसेला खिंडार! पुण्यानंतर औरंगाबाद मनसेतही अस्वस्थता; या बड्या नेत्याचा पक्षाला रामराम???

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : पुण्यात मनसेला मंगळवारी मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका आणि मनसेच्या फायब्रॅड नेत्या असणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. पुण्यानंतर आता औरंगाबमध्येही मनसेला धक्का बसला आहे. औरंगाबादेमध्ये मनसेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांनी ही अस्वस्थता असल्याचे बोलले आहेत.

2 दिवसांपूर्वी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा औरंगाबाद दौरा होता. या दौऱ्यात राज ठाकरेंनी औरंगाबादमधील कार्यकारिणीत तडकाफडकी बदल केले. 14 डिेसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष पदावरून सुहास दाशरथे (Suhas Dashrathe) यांची उचलबांगडी केली. 2 वर्षांपूर्वी शिवसेनेतून मनसेत आलेल्या सुहास दाशरथेंबाबत अशी कारवाई केल्याने त्यांच्या मनातील अस्वस्थता उघड झाली आहे.

पदावरून उचलबांगडी केल्यानंतर सुहास दाशरथे चांगेलच अस्वस्थ आहेत. माझे काय चुकले, असा सवाल त्यांनी राज ठाकरे यांना केला आहे. ‘मला पदावरून बाजूला केले आहे. महाराष्ट्र सैनिक म्हणूनच काम करेन. पण माझा एकच प्रश्न आहे. साहेब माझं काय चुकलं. मी काम करतोय, पक्ष संघटना बांधणीसाठी काम करतोय’, असे सुहास दशरथे म्हणाले आहेत.

कालच्या दौऱ्यातही स्वागतापासून नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी झटलो. पण माझं काय चुकलं हा खूप मोठा प्रश्न मनात आहे. ज ठाकरेंनी जी जबाबदारी आज माझ्यावर सोपवली आहे. ती निष्ठेनं पार पाडायला मी तयार आहे. मी पुन्हा महाराष्ट्रसैनिक म्हणून काम करायला, झेंडे बांधायला, संतरंज्या टाकायला तयार आहे. फक्त हे का घडलं, याचं स्पष्टीकरण मला हवं आहे, असे सुहास दशरथे म्हणाले आहेत.

मनसे सोडण्याच्या तयारीत तुम्ही आहात का, असा प्रश्न विचारल्यावर सुहास दाशरथे म्हणाले, ‘माझ्याकडे आज फक्त दोन गोष्टी आहेत. निष्ठा आणि स्वाभिमान. शिवसेनेत असतानाही मी त्याच निष्ठेने आणि स्वाभिमानाने काम केले, आजही त्याच गोष्टींच्या आधारे काम करतोय. यावर राजसाहेब जो निर्णय घेतील, त्यानुसारच मी काम करेन, असेही दशरथे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!