नवी दिल्ली : सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) वक्तव्यावर विराट कोहलीच्या खुलाशानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बटने (Salman Butt) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. कोहलीच्या या वक्तव्याचे उत्तर आता सौरव गांगुलीने द्यावे, असे त्याने म्हटले आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही दिवसांपूर्वी विधान केले होते की, विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडावे अशी त्यांची इच्छा नाही आणि त्यांनी स्वत: याबाबत कोहलीशी बोलले होते, पण त्याने ते मान्य केले नाही. गांगुली म्हणाला होता की मी विराट कोहलीला वैयक्तिकरित्या T20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार न होण्यास सांगितले होते पण कामाच्या ताणामुळे हा निर्णय घेतला.
त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत विराट कोहलीने सौरव गांगुलीच्या या विधानांचे स्पष्ट खंडन केले आहे. कोहलीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा त्याने बीसीसीआयला टी-20 कर्णधारपदाबद्दल सांगितले तेव्हा कोणीही आक्षेप घेतला नाही. तो म्हणाला की, जेव्हा मी टी-20 कर्णधारपदाबाबत बीसीसीआयशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी ते स्वीकारले. T20 कर्णधारपद सोडू नका, असे मला कोणीही सांगितले नाही.
गांगुली आणि कोहली यांच्या विधानातील विरोधाभासावर पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने म्हंटले आहे की, भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी सौरव गांगुलीने याचे उत्तर द्यावे. ते बीसीसीआयचे अध्यक्ष आहेत आणि विराट कोहली त्यांना सर्वांसमोर खोटारडे सिद्ध करत आहे ही काही छोटी गोष्ट नाही. दोन्ही दिग्गजांची विधाने पूर्णपणे भिन्न असून गांगुलीने याचे उत्तर द्यावे. असं सलमान बटने म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- तब्बल दीड वर्षांनी पुण्यातील शाळा आजपासून सुरू
- १९७१ च्या युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम- शरद पवार
- ‘राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाविना निवडणुका’
- आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भुजबळांची प्रतिक्रिया‘
- हा इतिहास संसदेत पाजळण्यापेक्षा मुंडे, राठोडांना सांगितला असता तर बरं झालं असते’


