🕒 1 min read
मुंबई: राज्य सरकार आता धान्य दुकानांवर दारू विकायचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे. खरं तर दारू ही आरोग्यासाठी घातक असते, मात्र काही शास्त्रज्ञांच्या मते रेड वाईन ही आरोग्यासाठी चांगली असल्याचेही निदर्शनात आले आहे. मात्र राज्य शासनाच्या या निर्णयावरूनच भाजप नेते निलेश राणे (Nilesh-Rane) यांनी जोरदार टीका केली आहे.
‘नरेंद्र मोदी ज्या सरकारचं नेतृत्व करतात त्या सरकारने देशातील जनतेला त्यांच्या कठीण काळात मोफत धान्य दिले. आणि शरद पवार ज्या सरकारचं नेतृत्व करतात त्या सरकारने धान्य दुकानांवर दारू विकायची तयारी केली आहे. चिअर गर्ल्स संस्कृती आणणारे दुसरं काय करणार.’ असा हल्लाबोल निलेश राणे यांनी ट्वीट करत केला आहे.
मोदी साहेब ज्या सरकारच नेतृत्व करतात त्या सरकारने देशातील जनतेला त्यांच्या कठीण काळात मोफत धान्य दिल आणि पवार साहेब ज्या सरकारच नेतृत्व करतात त्या सरकारने धान्य दुकानांवर दारू विकायची तयारी केलीय.
चिअर गर्ल्स संस्कृती आणणारे दुसरं काय करणार.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 16, 2021
दरम्यान काही देशांत रेड वाईन पिणे आरोग्यासाठी फायद्याचे समजले जाते. इटली येथील शास्त्रज्ञ अल्बर्टो बर्टेली यांच्यानुसार, वाईन अल्पप्रमाणात घेतल्यास ते लोकांना हृदयविकारापासून दूर ठेवतं. पॉलीफिनोल हेच याचं मुख्य कारण आहे. बर्टेली यांच्या मते, रोज 160 मिलीलीटर वाईन जेवणासोबत घेतल्यास ती फायदेशीर ठरू शकते. आता राज्य सरकारही काहीसा असाच विचार करून याबाबत विचार करत असल्याचेही बोलले जात आहे. मात्र भाजपकडून या निर्णयाचा विरोध केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- तब्बल दीड वर्षांनी पुण्यातील शाळा आजपासून सुरू
- १९७१ च्या युद्धात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम- शरद पवार
- ‘असे घडण्याची ही पहिली वेळ नाही’, आमित मिश्राचा कोहलीला पाठींबा
- …म्हणूनच ठरलंय या वटवृक्षाच्या सावलीत स्थिरावणार; रुपाली पाटीलांची वाजली टिकटिक
- ‘…आणि तुम्हाला आणखी काय हवे’, विराट कोहलीच्या ‘त्या’ वक्त्यव्यावर गावस्करांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
