मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची 100 कोटींच्या खंडणीप्रकरणात चांदीवाल आयोगाकडून मंगळवारी चौकशी करण्यात आली. चांदिवाल आयोगासमोर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी मोठा खुलासा केला आहे. 100 कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणामुळे आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.
अनिल देशमुख यांनी कधीही पैशांची मागणी केली नसल्याचे सचिन वाझेने म्हंटले आहे. चांदीवाल आयोगासमोर आज अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांना समोरासमोर बसवून प्रश्न विचारण्यात आले. तेव्हा सचिन वाझे याने आपण अनिल देशमुख यांना कधीही पैसे दिले नसल्याचे आणि त्यांनी कधीही पैसे मागितले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आपण कोणत्याही बार मालकाकडून अथवा त्यांच्याशी संबंधितांकडून पैसे घेतले नाही. तसेच देशमुख यांच्या कोणत्याही सहकाऱ्यांनाही पैसे दिले नसल्याचे वाझे याने सांगितले. त्यामुळे याप्रकरणात अनिल देशमुख यांच्यावरील आरोप निकालात निघण्याची शक्यता वाढली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही आपल्या पत्रात या दोघांच्या माध्यमातून खंडणी गोळा केली जात असल्याचा आरोप केला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच परमबीर सिंग यांनी आपल्याकडे तसे कोणतेही पुरावे नसल्याचे म्हटले होते. याप्रकरणी ईडीने देशमुख यांचे खासगी सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांनाही अटक केली होती. आता सचिन वाझे याने आपण अनिल देशमुख यांना आपण कोणतेही पैसे दिले नसल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्यावरील आरोप प्रकरण निकाली निघण्याची शक्यता वाढली आहे.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्यावर या प्रकरणी अनेक आरोप केले गेले. सचिन वाझेने दिलेल्या या कबुली जबाबानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- भाजपला सर्वोच्च न्यायालयाचा झटका; 12 आमदारांच्या निलंबन स्थगितीला नकार
- ‘ही’ निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवाच; चंद्रकांत पाटलांचं मविआला ओपन चॅलेंज
- महाविकास आघाडी सरकारबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्यं
- ‘आजपर्यंतच्या इतिहासात असा दिवस कधीच पाहायला मिळाला नव्हता’
- ‘पंतप्रधानांनी औरंगजेबाचा उल्लेख करत ‘त्या’ शक्तींना योग्य तो संदेश दिला’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
